रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई जलमय; प्रशासनाने जाहीर केली सुट्टी
मुंबई: मुंबईत काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय. काल मुंबईच्या दादर हिंदमाता पासून ते बोरीवली पर्यंत सखल भागात सर्वत्र पाणी जमा झाले होते. अनेक ठिकाणी लोकांच्या घरातही पाणी शिरले. नवी मुंबई भागातही पहाटेच्या वेळी अनेक ठिकाणी पाणी साठलेले पाहायला मिळाले. चुनभट्टी, परळ या ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी जमा झालेले आहे. सध्या लॉकडाऊन मुळे कार्यालये बऱ्याच अंशी बंद आहेत ज्यामुळे सामान्यांना गतकाळासारखा त्रास सहन करावा लागत नाहीये.
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर NDRF ची तुकड्याही तैनात करण्यात आलेल्या आहेत.
