पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे गमतीशीर वक्तव्य, ट्विटरवर हास्य कल्लोळ
‘रात्रीचा अंधार होता म्हणून, आमची एअर फोर्स वाट पाहात बसली’, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचं गमतीशीर वक्तव्य
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा बद्दला घेण्यासाठी मंगळवारी पहाटे भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राईक पद्धतीने हल्ला केला.
भारतीय हवाई दलाने बालाकोटच्या दहशतवादी तळावर जोरदार हल्ला चढवून दहशतवाद्यांना संपविल्याच्या बातमीनंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी एक मजेशीर वक्तव्य केलंय.
एका प्रेस काँफेरेन्स मध्ये पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेज खटक यांनी हसू आणणारे स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकार नायला इनायत यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, परवेज खटक यांनी हवाई हल्ला झाल्याचे मान्य केले आहे. तसेच, आम्ही भारताला प्रत्युत्तर देणार होतो, पण काळोख होता, त्यामुळे आम्हाला झालेल्या नुकसानीचा अंदाज येऊ शकला नाही, असं मजेशीर उत्तर खटक यांनी दिलंय. यापुढे भारताने अशी कारवाई केल्यास आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ, असेही खटक यांनी म्हटल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनीही भारतीय विमानांना पाकिस्तानने पळवून लावल्याचा खोटा दावा केला होता.
विडिओ पहा :
This is the Defence minister of Naya Pakistan: "Our air force was ready but it was dark.." Guys, ghabrana nahi hai. #okbye
pic.twitter.com/QqNYU7QoCI— Naila Inayat (@nailainayat) February 26, 2019
