“यापुढे लॉकडाऊन नको…” म्हणत प्रकाश आंबेडकरांनी कापून घेतले केस
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वाढीव लॉकडाऊन ला विरोध करत स्वतःचे केस कापून घेतले आहेत. या संदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी ट्विटर व फेसबुकवर प्रसारित केला आहे.
या सोबत त्यांनी एक पोस्ट लिहीत म्हटलंय की, “यापुढे लॉकडाउन नको…!
मजूर, न्हावी, धोबी, लोहार, कुंभार, चांभार इत्यादी अलुतेदार बलुतेदारांचे व्यवहार पुन्हा सुरू झाले पाहिजे. लॉकडाउनमुळे झालेल्या भीषण आर्थिक नुकसानीमुळे त्यांना विशेष मदत पुरवण्याचीसुद्धा गरज आहे.
आज मी स्वतः नाभिक बांधवाकडे जाऊन केस कापून घेतले व सर्वसामान्य जनतेने आपले सामान्य जीवन पुन्हा सुरू करावे असा आवाहन मी करतो.” कालच केंद्र सरकारने अनलॉक-३ जाहीर करतानाच लॉकडाऊन ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवत असल्याचे जाहीर केले.
