वाचा दहशतीच्या छायेत का आहेत तळोजा औद्योगिक वसाहतीतील दीपक फर्टीलायझर मधील कर्मचारी
पनवेल दि.२६ : “कंपनीच्या एच.आर. (मनुष्यबळ विकास व्यवस्थापक) मॅडम आमचं एकतंच नाही कामावर हजर राहण्याची जबरदस्तीच करत आहेत.” ही तक्रार आहे तळोजा एमआयडीसी मधील दीपक फर्टिलायझर कंपनीतील के८ विभागातील कर्मचाऱ्यांची. अशाच प्रकारच्या तक्रारी याच कंपनीच्या इतर विभागातून येत आहेत.
पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीतील दीपक फर्टिलायझर कंपनी सध्या सॅनिटीझर साठी लागणारं आयपी (अल्कोहोल) बनवण्यात व्यस्त आहे. कोरोनाच्या या महामारीत प्रचंडी मागणीमुळे प्लांट तीनही शिफ्ट मध्ये चालू आहेत. पण याच वेळी येथे अनेक कर्मचारी कोरोना पॉसिटीव्ह झाल्याचे आमच्या पनवेल प्रतिनिधीला कळले. जवळपास ३० जणं कोरोना पॉसिटीव्ह असून त्यांचे उपचार चालू असल्याचे कळते. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढण्यागे फिझिकाल डिस्टनसिंग चं ढिसाळ नियोजन असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. येथील कर्मचाऱ्याशी आम्ही जेव्हा संवाद साधला तेव्हा त्याने नाव न छपाण्याच्या अटीवर काही धक्कादायक खुलासे आमच्याजवळ केले. दीपक फर्टीलायझर च्या एच आर प्रमुख असलेल्या मॅडम कोरोना काळात शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त कामगारांना कामावर येण्याची जबरदस्ती करत असल्याचे तसेच जर कामावर येणारे नसाल तर थेट कामावरून काढून टाकण्याची धमकी देतात असे या कामगारांची तक्रार आहे. येथे कोणत्याही प्रकारे आम्हाला शारीरिक अंतर राखता येत नाही ज्यामुळे आम्हाला कामावर आल्यावर घरी परत जाताना स्वतःबरोबर कोरोनाचा विषाणू घरात शिरण्याची भीती वाटतेय असेही त्यांनी म्हटले. के८ या विभागात आतापर्यंत जवळपास २० कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण सापडल्याचे कळते. पण जर कंपनी प्रशासनाने याबाबत खुलासा केला तर चित्र जास्त स्पष्ट होईल.
या संदर्भात पनवेल महानगरपालिका प्रशासन, एमआयडीसी काय कारवाई करतात हे पाहणे लक्षणीय ठरेल. पण अशा प्रकारे जर कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ होत असेल तर प्रशासनाने थेट परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कठोर पावलं उचलणं गरजेचे आहे.
