Supriya Sule Twt
५६ इंच छाती केवळ भाषणापुरतीच, सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींवर टीका
पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटोसेशन करण्यात व्यस्त होते. हे सरकार दहशतवादाबद्दल अजिबात गंभीर नाही ही बाब दुर्दैवी आहे. केवळ भाषणापुरती ५६ इंच छाती आहे का असा सवाल खासदार खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
तसेच बारामती रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
सध्या राज्यात दहशतवादाशिवाय दुसरं काहीही ऐकायला मिळत नाही. पुलवामा घटनेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटोसेशन करण्यात व्यस्त होते अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. नोटाबंदीनंतर दहशतवाद कमी होईल असा दावा सरकार कडून करण्यात आला होता. मात्र गेल्या दोन वर्षात कधी नव्हती इतकी अस्वस्थता संपूर्ण देशात पहायला मिळत आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
तसेच हे भाजप सरकार धनगर समाजाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहे असा आरोप देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.
