“राष्ट्रपती राजवटीची मागणी ही नारायण राणेंची वैयक्तिक भूमिका”; भाजपने हात झटकले
मुंबई: काल भाजपचे राज्यसभेतील खासदार नारायण राणे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपालांकडे केली. यानंतर भाजपवर कोरोना संकट काळात राजकारण करत असल्याचे आरोप चहू बाजूंनी व्हायला सुरुवात झाली.
यावर नारायण राणेंनी राष्ट्रपती राजवटीची केलेली मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नसून नारायण राणे यांची ती वैयक्तिक भूमिका असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. काल सदर मागणी केल्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडवली होती.
