Cobra Post Election Celebrities
हे बॉलिवूड कलाकार पैसे घेऊन करणार राजकीय पक्षाचा प्रचार, कोब्रा पोस्टचे स्टिंग ऑपरेशन
निवडणूक जवळ येताच अनेक पक्ष आपल्या प्रचारासाठी बॉलिवूडचे कलाकार किंवा प्रसिद्ध गायक यांना बोलावतात. पण या निवडणुकांच्या प्रचारासाठी बॉलिवूडमधील काही कलाकार पैसे घेऊन प्रचार करत असल्याचा दावा ‘कोब्रा पोस्ट’ने केला आहे.
‘ऑपरेशन करावके’ या नावाचं स्टिंग ऑपरेशन कोब्रा पोस्टने केले. या स्टिंग ऑपरेशन मध्ये कोब्राच्या रिपोर्टर्सनी पीआर कंपनीचे प्रतिनिधी म्हणून अभिनेते, गायक, डान्सर आणि टीव्ही कलाकारांच्या मॅनेजरशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डील करण्यासाठी संपर्क साधला. त्या मध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी प्रस्तावाला होकार देत पक्षाच्या प्रचारासाठी 2 लाखांपासून 50 लाख रुपयाची मागणी केली. काहींनी तर आठ महिन्यांच्या करारासाठी 20 कोटी रुपयेही मागितले.
कोब्रा पोस्टने शेअर केलेल्या यादीमध्ये ३६ कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे :
पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य, कैलाश खेर, मिका सिंग आणि बाबा सेहगल. अभिनेता जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, विवेक ओबेरॉय, सोनू सूद, अमिषा पटेल, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, पुनीत इसार, सुरेंद्र पाल, पंकज धीर आणि त्यांचे पुत्र निकीतीन धीर, टीसका चोप्रा, दिपशिखा नागपाल, अखिलेंद्र मिश्रा, रोहित रॉय, राहुल भट, सलीम झैदी, राखी सावंत, अमन वर्मा, हितेन तेजवानी आणि पत्नी गौरी प्रधान, एवलीन शर्मा, मिनिषा लांबा, कोयना मित्रा, पूनम पांडे, सन्नी लिओनी, विनोदवीर राजू श्रीवास्तव, सुनील पाल, राजपाल यादव, उपासना सिंग, कृष्णा अभिषेक, विजय ईश्वरलाल पवार, तसेच नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य आणि आयटम डान्स गर्ल संभावना सेठ.
#OperationKaraoke An investigation by Cobrapost exposes three dozen Bollywood celebrities, including famous singers, comedians & actors, willing to post messages as their personal opinion on social media, on behalf of political parties, All for money.https://t.co/LUpB5REN13 pic.twitter.com/RTIxvlg23c
— Cobrapost (@cobrapost) February 19, 2019
कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशननुसार आता सर्वच राजकीय पक्षांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अभिनेत्री विद्या बालन, सौम्या टंडन, अर्शद वारसी आणि रजा मुराद या कलाकारांकडे गेलो असता या कलाकारांनी पैसे घेण्यास थेट नकार दिला, असंही कोब्रा पोस्टने सांगितले आहे.
