तामिळनाडूतील ४८० जणांसाठी एसटी आली धावून
सांगलीमध्ये लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथील सुमारे ४८० जण अडकले होती. ते एमआयडीसी सांगली/ कुपवाड मध्ये विविध ठिकाणी कामधंदा करत होती. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आपआपल्या गावी जाण्यासाठी ते एकत्र जमले परंतु त्यांना परत त्यांच्या सांगली येथील निवासाच्या ठिकाणी सांगली जिल्हा प्रशासनाने व महानगरपालिका यांनी परत पाठविले. आज पर्यत प्रशासनाने त्यांचे जेवण खाण्याची सोय केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न केल्यामुळे सदर व्यक्तींना सेलम तामिळनाडू येथे त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली .
सर्वांची वैद्यकीय तपासणी करून ते कोविड सदृश आजार नसल्याची तपासणी करून महसूल यंत्रणेने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत एसटीच्या १६ बसने तामिळनाडू राज्यातील सेलम येथील ४८० जणांना रवाना केले.
