न्यूयॉर्कमधील शिव जयंतीला नागराज मंजुळेची खास उपस्थिती
न्यूयॉर्क : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात तसेच जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांची जयंती फक्त महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर साजरी केली जाते.
अमेरिकेतील न्यूयॉर्क च्या कॉनस्युलेट जनरल ऑफ इंडिया, छत्रपती फाऊंडेशन आणि अल्बनी ढोल पथक यांच्यवतीने संयुक्त शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या सोहळ्याप्रसंगी नागराज मंजुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये असणाऱ्या तरुणांसोबत एक सेल्फी घेतला असून तो फोटो आपल्या ट्विटर अकाऊंट वर शेअर केला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने असा सेल्फी काढण्याचा मोह कधीतरीच होतो असे कॅप्शन नागराज मंजुळे यांनी या फोटोला दिले आहे.
