SHIVSENA TIGER
नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत रत्नागिरीतील ग्रामस्थ, शेतकरी आणि मच्छिमार यांची मते जाणून घेण्यासाठी सुकथनकर समिती काल रत्नागिरीमध्ये दाखल झाली होती. सुकथनकर समितीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव द.म.सुखथनकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, डॉ.श्रीरंग कद्रेकर, ज्येष्ठराज जोशी आणि अभय पेठे यांचा समावेश आहे.
जिल्ह्याधिकारी यांच्या कार्यालयात सुकथनकर समिती आणि ग्रामस्थ यांमध्ये बैठक चालू असता शिवेसनेकडून सुकथनकर समितीचे कामकाज थांबवण्यात आले. शिवसेना खा. विनायक राऊत, स्थानिक आमदार राजन साळवी आणि आमदार उदय यांसह जिल्ह्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या कार्यालयात धडक देत सुकथनकर समिती विरुद्ध घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पाला स्थिगीत दिली असताना, ही समिती नेमकी कोणा मार्फत स्थापन झाली आहे, असा प्रश्न खा. राऊत यांनी यावेळी सुखथनकर समितीला केला. ही समिती बेकायदेशीर असून, त्यामुळे नाहक तणाव निर्माण झाला आहे असे आ. राजन साळवी यांनी या वेळी सांगितले.
आपण शासनाच्या संमतीनेच नाणार ग्रामस्थांशी चर्चा करायला आलो असल्याचे सुकथनकर समितीचं म्हणणं होतं. परंतु शिवसेेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेे समितीची बाजू ऐकून घेण्यास तयार नव्हते. शासनाच्या परवानगीचे पत्र सादर करा नाही तर येथून चालते व्हा असे म्हणतं शिवसेनेचे कार्यकर्ते सुकथनकर समितीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते.
