वयस्कर अभिनेते आणि तंत्रज्ञांना कोरोना काळात काम करायला मज्जाव करणारे निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्दबातल
६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या अभिनेत्यांना कामात सहभागी होता येणार
मुंबई, दि. ७: ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले अभिनेते आणि तंत्रज्ञ यांना आता चित्रीकरण आणि संबंधित कामात सहभागी होता येणार आहे. अशा वयस्कर अभिनेते आणि तंत्रज्ञांना काम करायला मज्जाव करणारे महाराष्ट्र सरकारचे दोन निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल केले आहेत.
कोरोना प्रादुर्भावाचा धोका अधिक असल्यानं, ज्येष्ठ कलाकार तसंच तंत्रज्ञांना स्टुडिओत किंवा स्टुडिओबाहेर चित्रीकरण आणि संबंधित कामात सहभागी होण्यास मज्जाव करणारे दोन निर्णय राज्य सरकारनं जारी केले होते.
ज्येष्ठ कलाकार प्रमोद पांडे तसंच इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स संघटनेनं या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर आज निर्णय देताना, कोविड प्रतिबंधासाठीचे नियम सर्वांना सारखे लागू असल्याचं न्यायालयानं सांगितलं.
