शिवसेना व राष्ट्रवादी च्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणाची सुनावणी ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना आदेश
नवी दिल्ली, दि. ३०: शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रते प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी ३१ डिसेंबरपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी पूर्ण करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात सुनावणी होऊ शकणार नाही.त्यामुळं अतिरीक्त वेळ देण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांच्या वतीनं सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी केली. मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ती मागणी स्पष्टपणे फेटाळत अप्रत्यक्षपणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दणका दिला आहे. जाणकारांनुसार येत्या काळात सर्वोच्च न्यायालय विरुद्ध विधानसभा अध्यक्ष असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Source – AIR
