राहुल गांधी यांचा मोदी सरकारला इशारा
नवी दिल्ली: देशात आतापर्यंतच्या कोरोना बधितांच्या एकूण संख्येने १० लाखांचा आकडा पार केला आहे. याचसोबत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही २५ हजारांच्या पलीकडे गेली आहे. याच गोष्टींवर बोट ठेवून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला येत्या एका महिन्यात रूग्ण संख्या दुप्पट होण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात एक ट्विट करत राहुल म्हणाले की, “१० लाखांचा आकडा पार झाला आहे. याच गतीने जर कोविड १९ चा फैलाव झाला तर १० ऑगस्ट पर्यंत २० लाखांपेक्षा जास्त लोकं संक्रमित होतील.” पुढे ते म्हणाले की, “सरकारने या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस व नियोजित पावलं उचलणं गरजेचं आहे.”
10,00,000 का आँकड़ा पार हो गया।
इसी तेज़ी से #COVID19 फैला तो 10 अगस्त तक देश में 20,00,000 से ज़्यादा संक्रमित होंगे।
सरकार को महामारी रोकने के लिए ठोस, नियोजित कदम उठाने चाहिए। https://t.co/fMxijUM28r
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 17, 2020
