पोलीस भरती प्रक्रियेत राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांना प्राधान्य
नवी दिल्ली: राष्ट्रीय छात्र सेनेच्या सी प्रमाणपत्र धारकांना सरळ भरती प्रक्रियेनं पोलीस दलात भरती करताना प्राधान्य द्यावं, अशा सुचना केद्रीय गृह विभागानं सर्व राज्यांना केल्या आहेत.
त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी छात्रसेनेत सामील होतील. यामुळं पोलीस दलाला शिस्तप्रीय आणि तंदुरुस्त युवक मिळतील, असंही गृह विभागानं लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. केंद्रीय पोलीस दलात या प्रमाणपत्र धारकांना भरती करण्यात प्राधान्य देण्याचा निर्णय गृह विभागानं आधीच घेतला असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे. याच धर्तीवर तुटपुंज्या मानधनात फुल्ल ड्युटी करणाऱ्या होमगार्ड् ना ही पोलीस भर्तीत प्राधान्य द्यायला हरकत नाही. या मागण्या मुळात कागदोपत्री मान्य करून होणार नाहीत तर त्या प्रत्यक्षातही पूर्ण होणं गरजेचं आहे.