हार्बर कल्लोळ : गर्दीच्या वेळीस हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
मानखुर्द : आज सकाळी हार्बर रेल्वेवर मानखुर्द स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले.
आज सकाळी मानखुर्द स्थानकाजवळ केबल वायर तुटल्याची माहिती मिळते आहे. यामुळे मानखुर्द-पनवेल मार्गावरील लोकल वाहतुक काही वेळासाठी ठप्प झाली. या तांत्रिक बिघाडाचा परिणाम सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल वाहतुकीवरही झाला आहे. दरम्यान केबल वायर जोडण्याचे काम पूर्ण होत आले असले तरी अद्यापही वाहतुक पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे ऐन गर्दीच्या
वेळी प्रवाशांचा खोळंबा होतो आहे.
मानखुर्द येथे लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफला ओव्हरहेड वायर अडकल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला. यामुळे सकाळपासून पनवेलकडे जाणारी वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहे. याचा परिणाम अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गवर झाल्याने हार्बर मार्गावरील स्टेशनवर प्रवाशांची गर्दी दिसत आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेस हा बिघाड झाल्याने चाकरमान्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
