Gold Ornaments
सोन्याचे दर वाढले
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे दर वाढत आहे. ३१ जानेवारी रोजी सोन्याने भाव १५० रुपयाने वाढले होते. गेल्या दोन दिवसांत सोने दरात ७७० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा भाव 33,300 रुपयांपर्यंत जाऊन पोहचला आहे.
सध्या १० ग्रॅम सोने खरेदीसाठी जी.एस.टी. मुळे ३४,३०० रुपये मोजावे लागत आहे. सोने काही दिवसामध्ये ३५,००० रुपये ओलांडण्याची शक्यता आहे.
सध्याचा बाजारातला 24 कॅरेट सोन्याचा दर 33,300 तर 22 कॅरेट सोन्याचा दर 31,140 रुपये एवढा आहे. ऐन लग्न सराईच्या मुहूर्ता वर सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांचा सोने खरेदी करण्यासाठीचा प्रतिसाद कमी होत असल्याच सराफ दुकानदारानी सांगितले.
