Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे

NCP Png File

 

परभणी: परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी जिल्ह्याचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून परभणीत राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहेत.

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी हे कोणत्याच कामासाठी पक्षाच्या नगरसेवकांनाच विचारात घेत नाही. दरवेळी बाबाजानी स्वतःची मनमानी करत असतात मग आम्ही पक्षात का राहायचं? असा प्रश्न या नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार यांना केला आहे. या 13 नगरसेवकांनी आपले राजीनामे परिहार यांच्याकडे सोपवत, राजीनामे पक्ष श्रेष्ठींकडे द्यावे असे त्यांना सांगितले.

राष्ट्रवादीचे एकूण 18 नगरसेवक परभणी महानगरपालिका निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यापैकी 13 नगरसेवकांनी आज आपले राजीनामे दिले आहेत. परभणी शहरात लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीमध्ये मोठी दरी पडल्याचे दिसत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *