Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा

Raj Thackarey

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा

शिवसेनेननंतर आता राज ठाकरे यांनीही अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मनसे पाठिंबा असल्याचे एका निवेदनाद्वारे घोषित केले आहे. त्यात ते म्हणतात कि “राज्य सरकारला विश्वासात न घेता सी. बी. आय. ने कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांच्या घरावर छापेमारी केली. सी. बी. आय. ची स्वायत्तता संपुष्टात यावी ह्यासाठी अलोक वर्मा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे जे प्रकार केले ते देशाने पहिले. पण श्री. नरेंद्र मोदींनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न करू नये.”

“आपला देश संघराज्य आहे आणि राज्यांच्या अधिकारांवर घाला घालण्याचा कोणताही अधिकार केंद्र सरकारला नाही, हे भाजप सरकारने विसरू नये. केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात मा. ममता बॅनर्जी ह्यांनी जो आवाज उठवला आहे त्याबद्दल त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ह्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाठिंबा मी जाहीर करतो.” असे म्हणत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना लक्ष करत प्रत्यक्षपणे अण्णा हजरे यांना जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *