Subramaniam Swamy 1
भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. प्रियंका गांधी यांना बायपोल्ट्री नावाचा मानसिक आजार असून, तोल सुटल्यावर त्या लोकांना मारहाण करतात. सार्वजनिक जीवनात वावरताना हे अनेक लोकांसाठी घातक ठरू शकतं. प्रियांका गांधींचा स्वत:वरील ताबा कधी सुटेल हे सांगता येत नाही, अशा शब्दात सुब्रह्मण्यम स्वामींनी प्रियांका गांधींवर टीका केली.
प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्यानंतर भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्यावर शाब्दिक टीका करण्यास सुरुवात केली आहे.
