Rahul Gandhi 2
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल कराराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.
भारतीय वायू सेनेचे ३० हजार कोटी रुपये पंतप्रधान मोदी यांनी चोरले आणि उद्योगपती अनिल अंबानी यांना दिले, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना केला. ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा आधार घेत राफेल घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्यक्ष सहभाग होता असे देखील राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. फ्रान्स सरकारशी राफेल कराराबाबत मोदी प्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत आहेत असे संरक्षण मंत्रालयाने सांगितल्याचेही राहुल यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाईदलाचे 30 हजार कोटींचं नुकसान केलं आहे, हे आपण गेल्या वर्षभरापासून सांगत आहोत.
LIVE: Congress President @RahulGandhi addresses media on Rafale scam. #PakdaGayaModi https://t.co/33vWKJbGFB
— Congress (@INCIndia) February 8, 2019
चौकीदार ने राफ़ेल मामले में सुप्रीम कोर्ट से सबूत छिपाया है| उसके कांड का कच्चा चिट्ठा अब देश देख चुका है| जनता की अदालत में वो बच नहीं पाएगा|#PakdaGayaModi pic.twitter.com/3juz8N6Ecu
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 8, 2019
राफेल कराराचे कंत्राट एचएएल ला न देता अनिल अंबानी यांनाच मिळाले पाहिजे यासाठी मोदींकडून सतत दबाव टाकला जात होता, असे फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी कबूल केले आहे, असेही राहुल यावेळी म्हणाले.
राफेल कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण दोघेही खोटं बोलले असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात राफेल करारा बाबत खोटी माहिती सादर केली आहे. राफेल करारात नरेंद्र मोदी करत असलेल्या हस्तक्षेपावरून ‘चौकीदार चोर हैं’ हेच सिद्ध झाल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
राफेल कराराची जे पी सी समोर चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही राहुल यांनी पत्रकार परिषदेत केली.
गोव्यातील कथित चर्चेसंदर्भात राहुल यांनी केला खुलासा
गोव्यामध्ये पर्रिकरांसोबत झालेल्या भेटीत राफेल करारा संदर्भात कोणतीही चर्चा झाली नव्हती. पर्रिकरांच्या आरोग्याबाबत आणि इतर अनौपचारिक विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे पर्रीकरांसोबत झालेल्या वादावर आता पूर्णपणे पडदा पडला असेच म्हणावे लागेल.
