Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अवैध गर्भपात प्रकरणी मुंडे दाम्पत्य आणि महादेव पटेकर यांना १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

Baby-Abortion-2

बीड जिल्ह्यातील परळीमध्ये अवैध गर्भपात आणि माता मृत्यू प्रकरणी न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे, डॉ. सरस्वती मुंडे आणि महादेव पटेकर यांना दोषी ठरवत १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

परळीत सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये विजयमाला पटेकर या महिलेचा मे २०१२ मध्ये गर्भपात करताना मृत्यू झाला होता. मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात सर्रासपणे होत असल्याचे उघड झालं होतं. त्यामुळे बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी मुंडे दाम्पत्याला २०१२ मध्ये अटक करण्यात आली होती. मुंडे दाम्पत्यांनी कारवाई टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. अंबाजोगाई कोर्टाने ३ लाखांच्या जातमुचलक्यावर सप्टेंबर २०१२ मुंडे दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. पण विधिमंडळात हे प्रकरण तापल्यानंतर त्यांना पुन्हा अटक करत न्यायालयीन कोठडी मिळाली. या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला.

स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी मुंडे दाम्पत्याला सात वर्षांनंतर न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *