निवडणुकीत ज्याने मला पाडले आज त्याचाच प्रचार करायची माझ्यावर वेळ आली
पुणे: सध्या राज्यात सर्वत्र निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. ज्या व्यक्तीमुळे एखाद्याला पहिल्या निवडणूकित हार पत्करावी लागली त्याच व्यक्तीचा प्रचार दुसऱ्या निवडणुकीत करणे ही गोष्ट म्हणजे एखाद्याची मुद्दाम टिंगल केल्यासारखी झाली. पुण्यात असच काहीतरी नवीन घडलंय.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्याने मला पराभूत केले आता त्याचाच प्रचार करायची वेळ माझ्यावर आली आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले आहे.
आज हा प्रचार करण्याचं माझ्या जीवावर आलं आहे पण मी आघाडी धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे काहीही झालं तरी मी नगरमधून आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार, असं सत्यजीत तांबे म्हणाले. पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युवक पदाधिकाऱ्यांचा मेळावा ते बोलत होते.
सत्ताधारी पक्षाने गेल्या पाच वर्षात जे चुकीचे निर्णय घेतले आहेत. जनतेला सत्ताधारी पक्षाची चूक कार्यकर्त्यांनी दाखवून व समजून द्यावी असे आवाहनही यावेळी सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांना केले.
