Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या विषयी

जाणून घ्या महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या विषयी

प्रसिद्ध विश्वशास्त्रज्ञ स्टीफन विल्यम हॉकिंग यांचा आज प्रथम स्मृतीदिन. स्टीफन हॉकिंग यांचे गेल्यावर्षी १४ मार्च २०१८ रोजी निधन झालं.

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ या दिवशी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची वैद्यकीय संशोधन सचिव होती. स्टीफन हॉकिंग यांना वाचन, गणित, संगीत आणि भौतिकशास्त्राची सुरुवातीपासूनच आवड होती. वयाच्या १७ व्या वर्षी कॉसमॉलॉजी या विषयात त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती.

विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. १९८० साली हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला. हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला. “अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम” ह्या पुस्तकामुळे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले.

वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना मोटर न्यूरॉन डिसीज हा आजार झाला. मोटर न्यूरॉन डिसीज सारख्या दुर्धर आजारावर मात करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संशोधनात व्यतीत केले. १४ मार्च २०१८ रोजी केंब्रिजमध्ये त्यांचे निधन झाले. न्यूटन, अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्यानंतर विज्ञान आणि संशोधन या विषयासाठी आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *