चंद्रकांत पाटील दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री आहेत – राजू शेट्टी
कोल्हापूर: महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राज शेट्टी यांनी केले आहे.
माझ्याकडे चंद्रकांत पाटलांची सर्व माहिती आहे. अभियंता, ठेकेदार कोणकडून किती व कधी घेतले, मातीत किती घेतले ही सगळी माहिती घेऊन पुरावे घेऊन मी बिंदू चौकात येतो. तुम्हीही तुमच्याकडील माझ्याबद्दलची सर्व माहिती घेऊन या, असदेखील राजू शेट्टी म्हणाले.
माझ्यावर केलेले सर्व आरोप चंद्रकांत पाटलांनी सिद्ध करुन दाखवावे. ईडी, आयकर विभाग, सीआयडी, सीबीआय यांच्यामार्फत माझी चौकशी करा आणि आमच्यावर कारवाई करा असं आव्हान राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना दिलं.
एखाद्या नेत्याकडे एवढा पैसा कुढुन येतो हे जनतेला कळणं गरजेचं आहे, असं राजू शेट्टी चंद्रकांत पाटलांना उद्देशून म्हणाले.
