Rahul Gandhi 2
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गोव्याच्या दौऱ्यावर असताना मंगळवारी आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर
यांची स्वतः विधानसभेत जाऊन भेट घेतली. गोवा विधानसभेचे उपसभापती आणि आमदार मायकल लोबो
या भेटी वेळी पर्रिकर यांच्या सोबत उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना लोबो म्हणाले,
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि राहुल गांधी यांची भेट विशेष होती. या भेटीदरम्यान, राहुल गांधींचे
अनेक रूप बघायला मिळाले. राहुल गांधी अत्यंत साधी व्यक्ती आहे. त्यांच्या माणुसकीचे, साधेपणाचे
प्रत्येक भारतीयाला कौतुक आहे. राहुल गांधी सारख्या नेत्याची देशाला आणि गोव्याला गरज आहे.
