Photo पाहा : अशा स्वरूपाची असेल २० रूपयाची नवीन नोट…
नवी दिल्ली: आरबीआयने गेल्या दोन-तीन वर्षांत ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटांसह २०० रुपये, १०० रुपये, ५० रुपये आणि १० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. आता लवकरच त्याच्याबरोबरीने २० रुपयाची नवी नोट देखील चलनात येणार आहे.
२० रुपयाच्या नव्या नोटेचा रंग हा हिरवट पिवळा असा आहे. या नव्या नोटेवर आरबीआय गर्व्हर्नर शक्तीकांत दास यांची सही असणार आहे. या नव्या नोटेमध्ये महात्मा गांधी यांचा फोटो आहे. नोटेवर २० हा अंक देवनागरितदेखील छापण्यात आला आहे. सुरक्षा ब्रँडवर भारत आणि आरबीआय असेदेखील लिहण्यात आले आहे. या नोटेच्या मागील बाजूस वेल्लोरा लेणींचे चित्र आहे. तसचे स्वच्छ भारतचा लोगो आणि घोषवाक्यादेखील छापण्यात आले आहे. तसेच अधिकृत नोट ओळखता यावी यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा आणि खुणांचा वापर या नोटेवर करण्यात आला आहे.

दरम्यान सध्या चलनात असलेल्या २० रुपयाच्या नोटांचादेखील वापर बाजारपेठेमध्ये कायम राहणार आहे.
