बालाकोट हवाई हल्ल्याबाबत पत्रकार फ्रांचेस्का मरीनोने सत्य जगासमोर आणल्याचा दावा, १३०-१७० दहशतवादी मारले गेले, अन ४५ जखमी
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या लाख प्रयत्नांनंतरही लपवलेलं बालाकोटचं सत्य हळू-हळू जगासमोर समोर येत आहे. बालाकोट हवाई हल्ल्याच्या तीन दिवसांनंतरच प्रत्यक्षदर्शींच्या जबानीच्या आधारावर जैश-ए-मोहम्मद च्या दहशतवाद्यांच्या मोठ्या प्रमाणात ठार झाल्याच्या वृत्ताला समोर आणणारी स्वतंत्र पत्रकार फ्रांचेस्का मरिनो ने आता पूर्ण घटनेचे विस्तृत तपशील जगासमोर आणले आहेत. त्यांच्या नुसार हवाई हल्ल्यात जवळपास १७० दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच ४५ दहशतवाद्यांवर अजूनही उपचार चालू आहेत.
फ्रांचेस्का या दक्षिण आशिया विभागात कार्यरत आहेत. त्यांनी पाकिस्तानचा दौरा केला असून तिथल्या दहशतवादी संगठनांवर त्यांनी पुस्तकही लिहिले आहे. ‘स्ट्रिंगर एशिया’ मध्ये प्रकाशित त्यांच्या रिपोर्ट नुसार, २६ फेब्रुवारी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी भारतीय वायुसेनेच्या हवाई हल्ल्यानंतर अडीच तासांनी घटनास्थळापासून २० किलोमीटर दूर पाकिस्तानच्या शिकीयारी कॅम्पहून एक तुकडी तिथे पोहोचली होती.
त्यानंतर हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे व जखमी दहशतवाद्यांना शिंकीयारी मध्ये असलेल्या हरकत-उल-मुजाहिद्दीन च्या शिबिरात घेऊन जाण्याचे काम सुरू झाले. तिथे पाकिस्तानी सेनेच्या डॉक्टरांनी जखमी दहशतवादयांवर उपचार केले. दरम्यान गंभीररित्या जखमी झालेल्या २० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला असून ४५ दहशतवाद्यांवर अजूनही इलाज चालू आहे.
चूप राहण्यासाठी दहशतवाद्यांच्या कुटुंबाला दिली गेली मोठी रक्कम
सर्वात धक्कादायक गोष्ट अशी की पूर्णपणे ठीक झालेले व शारीरिकरित्या अपंगत्व आलेले दहशतवादी अजूनही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहेत. त्यांना अजून पर्यंत घरी सोडण्यात आलेलं नाही. भारतीय सैन्याच्या हवाई हल्ल्यात मारल्या गेल्या दहशतवाद्यांच्या परिवारांना चूप ठेवण्यासाठी जैश-ए-मोहम्मद चे सदस्य त्यांच्या घरी गेले व त्यांच्या परिवारांना लाचेच्या स्वरूपात मोठी रक्कम देण्यात आली आहे.
