फेसबुकने काँग्रेसशी संबंधित ६८७ पेसेज केले बंद
नवी दिल्ली: आगमी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल नेटवर्कींग कंपनी फेसबुकने मोठी कारवाई केली आहे. काँग्रेस पक्षाशी संबंधित ६८७ पेज फेसबुकने बंद केली आहेत. तसेच पाकिस्तानी सैन्याच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित १०३ फेसबुक खातीही डिलीट करण्यात आली आहेत. सोमवारी फेसबुकने या कारवाईबाबत माहिती दिली.
काँग्रेसशी संबंधित काही लोकांनीच ही फेसबुक पेजेस तयार केली होती, त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. फेसबुकने अशा पद्धतीने एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित पेजेसवर कारवाई करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. फेसबुकने कारवाईसंबंधी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, खोटी माहिती प्रसारीत केली जात होती. त्यामुळे हे पेजेस हटविण्यात आल्याचं फेसबुकने म्हटलं आहे. निवडणूक काळात खोट्या बातम्या पसरविणारे अकाउंट बंद करण्यात येणार असल्याचं फेसबुकनं म्हटलं होतं. त्याचा पहिला फटका काँग्रेस पक्षाला बसला आहे.
भारतात सर्वाधिक 30 कोटी फेसबुक युजर आहेत. फेसबुकने ही कारवाई करताना म्हटले आहे की, लोकांनी बनावट खाती काढून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जोडून घेऊन संपर्क वाढवले. या बनावट खात्यांवरून स्थानिक बातम्यांबरोरच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करणारे संदेशही टाकण्यात येत होते. त्यामुळी हे पेजेस बंद करण्यात आल्याचे फेसबुकने सांगितले.
दरम्यान, फेसबुकने आज पाकिस्तानी सैन्याच्या जनसंपर्क विभागाशी संबंधित फेसबुकवरील १०३ पेजेसही हटवले आहेत. हे फेसबुक पेजेस पाकिस्तानामधून चालवण्यात येत होते.
