पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे ब्लॅकमेलर – प्रकाश आंबेडकर
लोकसभा निवडणुकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. यवतमाळमध्ये निवडणून आयोगावर केलेल्या चुकीच्या विधानानंतर आता प्रकाश आंबेडकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांनी मोदी हे देशातील सर्वात मोठे ब्लॅकमेलर असा उल्लेख केला आहे. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्यासाठी भाजपाने त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्लॅकमेलर असून त्यांनी सोनिया गांधी यांना तुमच्या जावयाला जेलमध्ये जायचं नसेल तर तुम्ही कोणासोबतही आघाडी करु नका अशी अट मोदींनी काँग्रेससमोर ठेवली असल्याचा दावाही आंबेडकरांनी यावेळी केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्यावरदेखील आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले आहे.
