काँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यास सर्व ‘चौकीदार’ तुरुंगात जातील
नागुपर: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी भेटलेले नाना पटोले यांच्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी (४ एप्रिल) मोदींवर हल्लाबोल केला.
राफेल प्रकरण झालेली चोरी छोटी नाही तर खूप मोठी आहे. २०१९ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यावर ‘चौकीदार’ तुरुंगात जाईल, अशा शब्दात राहुल यांनी नरेंद्र मोदींवर तोफ डागली.
नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्या या निवडक उद्योजकांचे कोटीच्या घरातील कर्ज माफ करण्यास व त्यांना देश सोडुन पळून जाण्यास मोदी व त्यांच्या पक्षातील काही लोकांनी मदत केली आहे, अशी टीकादेखील राहुल यांनी यावेळी केली.
राफेल युद्ध विमान खेरदीच्या वाटाघाटी मोदींच्या हस्तक्षेपाने झाले आहे, २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर हे सर्व चौकीदार तुरुगांत जातील. आम्ही त्यांना त्यांच्यावर कारवाई होणार, असा इशारही राहुल गांधी यांनी यावेळी दिला.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जोगेंद्र कवाडे उपस्थित होते.
