कवितेच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांची आशिष शेलारांवर बोचरी टीका
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये एक कवी जागा होताना दिसत आहे. त्यातच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे सध्या जास्तच चर्चेत आहेत. आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी व मनसे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली होती. मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिले होते. त्या पाठोपाठ आता धनंजय मुंडेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर कविता पोस्ट करत आशिष शेलार यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
ओढून ताणून करु लागले
बिनबुडाच्या आरोपाची कोशिष
मंत्रीपदाचा निसटला शेला
नाही मिळाले कमळाबाईचे आशिष!
नाही पावले देवेंद्र कारण
कमळाबाईच्या अध्यक्षाचे तोंड म्हणजे
फुटके खापर आहे!
युज अँन्ड थ्रो अशा या
बोलघेवड्याचा फक्त वापर आहे!
#कभी_भूला_कभी_याद_किया
या ट्विटमध्ये मुंडे यांनी आशिष शेलारांचे तोंड म्हणजे फुटके खापर आहे, असे म्हंटले आहे. आता या टीकेला आशिष शेलार काही उत्तर देणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
