आज महाराणा प्रताप यांची जयंती, जाणून घ्या त्यांच्या विषयी काही रंजक गोष्टी
आपल्या शौर्य, पराक्रम आणि साहसासाठी ओळखले जाणारे मानी राजा महाराणा प्रताप यांची आज जयंती आहे. मेवाडचे राजा महाराणा प्रताप एक असं नाव आहे, ज्यांच्या कथांनी इतिहासातली सोनेरी पाने भरलेली आहेत. त्यांच्यावर बरेच चित्रपट बनले, शोधप्रबंध लिहिले गेले, पुस्तकं-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. आजही लोकं महाराणा प्रताप यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी इच्छुक आहेत. आजही भारतीय त्यांचं नाव आदराने घेतल्यावर देशभक्ती आणि साहस धमन्यांत भिनायला लागतं. त्यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त आम्ही आपल्याला त्यांच्या युद्धविषयक रंजक गोष्टींबाबत माहिती देणार आहोत.
- महाराणा प्रताप यांचा जन्म मेवाडचे ९ मे १५४० ला झाला होता.
- महाराणा प्रताप यांच्या प्रिय घोड्याचं नाव चेतक होतं. त्यांच्यासारखाच त्यांचा घोडाही हुशार व साहसी होता.
- महाराणा प्रताप यांना लहानपणी लाडाने किका नावाने बोलावलं जात असे.
- १८ जून १५७६ रोजी महाराणा प्रताप आणि मुघल शासक अकबर यांच्या दरम्यान हल्दी घाटात झालेल्या युध्दाची तुलना महाभारतातल्या युध्दाशी केली जाते.
- इतिहासकारांनुसार हल्दी घाटातल्या युद्धात न अकबर जिंकला न महाराणा प्रताप हरले. या युद्धाला टाळण्यासाठी अकबर ने सहा वेळा आपले शांतिदूत पाठवले होते, पण प्रत्येकवेळी त्यांनी अकबराचा प्रस्ताव फेटाळून लावला.
- हल्दी घाटातल्या युद्धात महाराणा प्रताप यांनी फक्त २०,००० सैनिकांनिशी अकबराच्या ८०,००० सैनिकांचा सामना केला होता. आणि तरीही अकबराला त्यांना वाकवता आलं नाही.
