Girish Mahajan Twitter DIO NASHIK 2
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जवळपास सर्व मागण्या सरकारने पूर्ण केल्या
आहेत. कॅबिनेटने लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत आता मुख्यमंत्र्यांचा सुद्धा
समावेश करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटने अत्यंत महत्वाचा
निर्णय घेतला असला तरी अण्णा हजारे सरकारवर नाखुश असल्याचे दिसत आहे.
आज सकाळी ११ वाजता राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेत
अण्णा हजारेंनी आपल्या उपोषणास सुरूवात केली.
अण्णा उपोषणावर ठाम जरी असले तरी येत्या एक-दोन दिवसांत आम्ही अण्णांची
भेटू घेणार आहोत. तसेच अण्णांनी तब्येतेची काळजी करत आपले उपोषण मागे घ्यावे.
अण्णांच्या उर्वरित मागण्याही लवकरच पूर्ण होतील. अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश
महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
बुधवारी जलसंपदामंत्री महाजन अण्णांची भेट घेणार होते. पण उपोषणाबाबतचा
अण्णांचा आक्रमक पवित्रा पाहता त्यांनी राळेगणसिद्धीला जाण्याचे टाळले असे बोलले
जाते. त्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकायुक्त नियुक्तीचा निर्णय झाला असला तरी त्याचे कायद्यात
रूपांतर विधानसभेच्या मंजुरीशिवाय होणार नसल्याने आपण आंदोलनावर ठाम असल्याचे
अण्णा हजारेंनी सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळवा तसेच स्वामिनाथन
आयोगाची अंमलबजावणी व्हावी ह्या दोन प्रखुम मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत
उपोषण मागे घेणार नाही असे अण्णा हजारेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
