DEVENDRA FADANVIS 3
सातारा: सर्व विरोधक अण्णांचं नाव घेऊन राजकारण करत आहेत. सुरुवातीच्या काळात ज्यांनी अण्णांना नावे ठेवली असेच लोक आज आम्ही आण्णांच्या पाठीमागे आहोत असे सांगून उपोषणास पाठींबा देत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आम्ही अण्णांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. अण्णांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी व आपलं उपोषण मागे घ्यावे
अशी विनंती देखील मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
लोकायुक्तांच्या संदर्भात जी संयुक्त समिती बनवण्याची मागणी अण्णांनी केली होती त्यासाठी आम्ही होकार दिला आहे. केंद्र सरकारचे जे विषय आहेत त्यासंदर्भातही पंतप्रधनांना पत्र दिलं आहे.अण्णांनी कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नये. कोणालाही त्यांच्या उपोषणात रस नाही सर्व जण अण्णांचं नाव घेऊन राजकारण करून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही अण्णांच्या सर्व मागण्या पूर्ण करू, त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावं. असे विनंती करणारे पत्रही मी पाठवले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
