Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

युगनिर्माते प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले बेलापुर येथे स्वच्छता मोहीम संपन्न !

युगनिर्माते प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले बेलापुर येथे स्वच्छता मोहीम संपन्न !

नवी मुंबई, दि. ३०: राज्याचे सारं हे दुर्ग आणि याच दुर्गांचे संवर्धन करण्याचे कर्तव्य हे प्रत्येक नागरिकांचे आहे, हे या मोहिमेतून निदर्शनास आले. युगनिर्माते प्रतिष्ठानच्या वतीने नवी मुंबईतील एकमेव किल्ला किल्ले बेलापूर या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत ८० ते १०० NSS स्वंयसेवक, न.मुं.म.पा. अधिकारी, स्वच्छता दुत, मित्रपरिवार उपस्थित होते. मोहिमेकरिता विशेष सहभाग हा सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खारघर व कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी येथील NSS स्वंयसेवकांचा होता. स्वच्छता अधिकाऱ्यांनी उपस्थितांना “माझा कचरा, माझी जबाबदारी” हे घोषवाक्य सांगत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले तसेच युगनिर्माते प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर वसमाने यांनी सर्व उपस्थितांना माझे गडकिल्ले माझी जबाबदारी असे सांगत उपस्थित युवा वर्गात चेतना निर्माण केली. दरम्यान किल्ले बेलापूर यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करेपर्यंत युगनिर्माते प्रतिष्ठान किल्ल्याच्या संवर्धनाकरिता काम करत राहील, अशी ग्वाही अध्यक्ष शंकर वसमाने यांनी दिली.
सदर प्रसंगी स्वच्छता अधिकारी, न.मुं.म.पा. विजय नाईक व मिलिंद तांडेल, सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग चे प्राध्यापिका सुनिता पाल आदी उपस्थित होते.

त्याचसोबत युगनिर्माते प्रतिष्ठान उपाध्यक्ष अक्षय चव्हाण, सरचिटणीस सौरभ आहेर, सहसचिव सुदर्शन कौदरे, उपसचिव आकाश वसमाने, सदस्य विशाल पिंगळे, सदस्य तझीन काझी सुर्वे, मनोज भोईर, संतोष गोळे, खान कनिज, मयुरी धुमाळ, राज धुमाळ आदी पदाधिकारी/ सदस्य उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *