मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे यशंवत जाधव यांची निवड; काँग्रेसची छुपी मदत आली कामाला
मुंबई, दि.५: काँग्रेसने मुंबई महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला दिलेला शब्द पाळला. स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे यशवंत जाधव पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले. तर मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या संध्या दोशी शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवडून आल्या.
काँग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी झाल्याने शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे भाजपचे मनसुबे फोल ठरले. पालिकेच्या वैधानिक समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.
