घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरात मे महिन्यात तीन पूर्णांक २१ शतांश टक्के घट
देशातल्या घाऊक किंमतीवर आधारित चलन फुगवट्याचा निर्देशांक मे महिन्यात तीन पूर्णांक २१ शतांश टक्क्यांनी कमी झाला आहे. इंधन आणि उर्जेचे दर कोसळल्यामुळे हा परिणाम घडला.
अन्न पदार्थाच्या किंमतीवर आधारित चलन फुगवट्याचा निर्देशांक मे महिन्यात एक पूर्णांक १३ टक्के राहिला. एप्रिलमधे तो दोन पूर्णांक ५५ टक्के इतका होता. लॉकडाऊनमुळे देशातल्या निवडक संस्था आणि औद्योगिक आस्थापनांकडून राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राला मिळालेल्या ऑनलाईन माहितीच्या आधारे ही आकडेवारी निश्चित केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
