कोरोनाच्या ओमीक्रॉन प्रकारावर वेळीच दक्षता घेण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा(WHO) सर्व देशांना इशारा
कोविड-१९ च्या प्रतिबंधक उपाययोजनांच्या दृष्टीनं सर्व देशांनी आपापल्या देशातील परिस्थितीचा वारंवार आढावा घ्यावा, उपायांचं मूल्यांकन करावं आणि उत्परीवर्तीत नव्या ओमिक्रॉन विषाणूच्या प्रतिबंधासाठी लसीकरण कार्यक्रमाला वेग द्यावा, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे.
सध्या वापरल्या जाणाऱ्या लसी या नव्या विषाणूसाठी किती उपयुक्त ठरतील याबाबत आत्ता निश्चितपणे काही सांगणं कठीण असल्याचंही संघटनेनं म्हटलं आहे. या नव्या विषाणूमुळे कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचा जास्त लोकांना फटका बसण्यापूर्वी त्यावर प्रतिबंधक उपाययोजना तातडीनं सुरु करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं संघटनेचे महासचिव टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.
Source-AIR
