भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन झाले WHO चे कार्यकारी अध्यक्ष
नवी दिल्ली: जगातील इतर देश जसे कोरोनाशी लढत आहेत तसेच भारतही या रोगाशी दोन हात करत आहेत. लोकसंख्येच्या गुणोत्तरात पाहायला गेले तर भारताने या रोगावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेले दिसतेय. यामुळे जगभर भारताचं कौतुक होतंय.
याचेच फलित म्हणून देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची जागातीक आरोग्य संघटनेने(WHO) कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. येत्या २२ मे रोजी ते कार्यभार स्वीकारणार आहेत. या नियुक्तीमुळे भारताच्या पेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
