जवळपास १०० पोती कचरा गोळा झाला
रत्नागिरी, दि. १३: महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून या समुद्र किनाऱ्यावरील काही मोजके किनारे सोडले तर बाकी इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय. परंतू गेल्या वर्षांपासून दिवसांपासून कोकणातील निसर्गप्रेमी तरुणाई स्वयंप्रेरणेने पुढे येत किनारे स्वच्छता मोहिमा राबवत आहे.
अशाच प्रकारे रत्नागिरीतील वी ग्रुप(We Group) नामक तरुणांच्या संस्थेने येथील कुर्ली समुद्र किनाऱ्यावर स्वयंस्फूर्तीने एकत्र येत स्वच्छता मोहीम राबविली. सलग तीन आठवडे श्रमदानातून या तरुणांनी जवळपास १०० पोती कचरा गोळा केला. ज्यात ८० पोती प्लास्टिक तर २० पोती इतर हानिकारक कचरा जमा झाला.
रत्नागिरी सारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा समुद्र किनारी पडून राहणे ही फार चिंतादायक बाब आहे.
रत्नागिरीतील वी ग्रुप(We Group) संस्थेने केलेला उपक्रम भविष्यात कोकण किनारपट्टीवरील इतर ग्रामस्थांनीही सुरू करणे ही काळाची गरज आहे.
खालील लिंकवर क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter || INSTARAM ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा
