महाराष्ट्रात मतदानाला सुरुवात, राज्यातील प्रमुख लढतींवर एक नजर
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिला टप्प्यातील मतदान ११ एप्रिलला पार पडले. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १० मतदारसंघांचा समावेश आहे.
यामध्ये सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांसह आनंदराव अडसूळ, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, डॉ. प्रीतम मुंडे अशा दिग्गजांचा समावेश आहे. राज्यात दहाही ठिकाणी चुरशीची लढत असल्याने अख्या राज्याचे लक्ष याकडे लागले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती:
१) सोलापूर – सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस), प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
२)उस्मानाबाद – (धाराशीव) – ओमराजे निंबाळकर (शिवसेना), राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी), अर्जुन सलगर (वंचित बहुजन आघाडी)
३) अकोला – संजय धोत्रे (भाजप), हिदायतुल्ला पटेल (काँग्रेस), प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), भाई बी. सी. कांबळे (बहुजन समाज पार्टी)
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना), डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी), बळीराम सिरस्वार (वंचित बहुजन आघाडी)
५) परभणी – संजय जाधव (शिवसेना), राजेश विटेकर (राष्ट्रवादी), आलमगीर मोहम्मद खान (वंचित बहुजन आघाडी)
६) लातूर – सुधाकर शृंगारे (भाजप), मचिलचंद्र कामत (काँग्रेस), राम गारकर (वंचित बहुजन आघाडी)
७) हिंगोली – हेमंत पाटील (शिवसेना), सुभाषराव वानखेडे (काँग्रेस), मोहन राठोड (वंचित बहुजन आघाडी)
८)नांदेड – अशोक चव्हाण (काँग्रेस) विरुद्ध प्रतापराव पाटील-चिखलीकर (भाजप)
९) बीड – प्रीतम मुंडे (भाजप), बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी), विष्णू जाधव (वंचित बहुजन आघाडी)
१०) अमरावती – आनंदराव अडसूळ (शिवसेना), गुणवंत देवपारे (वंचित बहुजन आघाडी)
