खुशखबर ! राज्यातील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू
शासकीय कर्मचार्यांच्या पाठोपाठ आता राज्यातील अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग अखेर लागू करण्यात आला असून याबाबतचा निर्णय शासनाने शुक्रवारी जाहीर केला.
वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणीची अधिसूचना 30 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार शिक्षकांनाही लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील अनुदानित खासगी प्राथमिक – माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये आणि सैनिकी शाळांतील पूर्णवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू होणार आहे.
सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनतर शिक्षकांना याचा लाभ मिळाला होता तसेच पाचव्या वेतन आयोगाचा लाभ शिक्षकांना सुमारे चार महिन्यांनतर देण्यात आला होता. सातवा वेतन आयोग काही दिवसांतच देण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्याबरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही
वेतन आयोग लागू होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
