राज ठाकरेंनी कुठेही लोकसभेची एक जागा लढावी आणि स्वतःचे डिपॉझिट वाचवून दाखवावं – विनोद तावडे
मुंबई: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसचा पाठिंबा घेऊन मनसेने राज्यात कुठेही लोकसभा निवडणूक लढवावी आणि डिपॉझिट वाचूवन दाखवावे, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंना दिले आहे.
मंगळवारी रंगशारदामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली होती. याच टीकेला उत्तर देताना विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना हे आव्हान केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अतिशय समजूतदार नेते आहेत. आपल्या सैन्यांनी जी धाडसी कामगिरी केली, त्यावर टीका करणे म्हणजे सैन्याचा अपमान करण्यासारखा आहे. पोपटाचा रंग हिरवा असतो हा पोपट पाकिस्तानचा तर नाही ना, अशी खोचक टीकाही तावडे यांनी यावेळी केली.
