Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भारतीय सिनेसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पुणे/मुंबई, दि. २६: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. त्यांना ५ नोव्हेंबरपासून पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील अनेक भागांनी काम करणे बंद केले होते, त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही आणि त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. विक्रम गोखले यांचे पार्थिव आज सायंकाळपासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त समजताच हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याच वेळी, त्यांचे चाहते देखील आपल्या लाडक्या अभिनेत्याला आदरांजली वाहत आहेत.

नुकतेच विक्रम गोखले यांच्या निधनाची अफवाही पसरली होती, त्यानंतर सर्व अभिनेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्या मुलीने एका माध्यमाशी संवाद साधताना सांगितले की, अभिनेत्याची प्रकृती गंभीर असून ते आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत.” मात्र जीवन आणि मृत्यू यांच्यात झुलणाऱ्या या अभिनेत्याने आज अखेरचा श्वास घेतला. १९७१ साली त्यांनी वयाच्या २६ व्या वर्षी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवत कारकिर्दीस सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांच्या सोबत अग्निपथ चित्रपटातील त्यांची पोलिस अधिकार्‍याची भूमिका खूप गाजली होती.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *