शेकापचे जयंत पाटील ठरले अपयशी; मिळाली केवळ १२ मते
मुंबई, दि. १२: विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक पार पडली. यानंतर संध्याकाळी निकाल जाहीर झाले. निवडणुकीचा निकाल महायुतीसाठी धक्कादायक ठरेल अशी अटकळ बांधण्यात येत होती. परंतू, ती फोल ठरत भाजपचे ५, शिवसेना शिंदे गटाचे २ व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष(अजित पवार) यांचे २ उमेदवार निवडून आले. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव व शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजय झाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत उमेदवार शेकापच्या जयंत पाटील यांना धक्कादायकरीत्या पराभवाचा सामना करावा लागल. त्यांना पहिल्या पसंतीची फक्त १२ मते पडली.
११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे कोणच्या पक्षाचा एक उमेदवार पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. हि निवडणूक कॉंग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा वाजणारी ठरली कारण कॉंग्रेसची एकूण ८ मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शेकापच्या जयंत पाटील यांनी यांना याचमुळे नामुष्कीचा सामना करावा लागल्याचे सांगितले जात आहे.
पक्षनिहाय विजयी उमेदवारांची यादी
भाजपचे
1) योगेश टिळेकर – 26 मते
2) पंकजा मुंडे – 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे – 26 मते
5) सदाभाऊ खोत – 24
शिवसेना (शिंदे गट)
1) भावना गवळी – २४
2) कृपाल तुमाने – २५
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे – २४
2. राजेश विटेकर – २३
काँग्रेस विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव – 26
शिवसेना ठाकरे गट
1) मिलिंद नार्वेकर – २४

