Video: जितेंद्र आव्हाड यांच्या आवाजातील गाणं ऐका ….राफेल प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय सरचिटणीस व आमदार जितेंद्र आव्हाड हे विरोधकांवर टीका करण्याच्या आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आवाजातील “चुनाव का महिना राफेल करे शोर…” या नव्या गाण्यामार्फत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. “सावन का महिना …” या स्व. सुनील दत्त वर चित्रित झालेल्या गाण्याचे विडंबन गीत त्यांनी केले आहे. निवडणूक सुरू झाल्या तरी राफेल प्रकरण काही थंड होण्याचं नाव घेत नसल्याने तसेच सध्या या प्रकरणावरुन राहुल गांधी हे आद्यप प. नरेंद्र मोदींवर शरसंधान करत आहेत. तोच धागा पकडून त्यांनी ही टीका केली आहे.
या गाण्याचे बोल पुढील प्रमाणे आहेत.
‘चुनाव का महिना राफेल करे शोर.. पुरी दुनिया बोले भाई चौकीदार है चोर…
अनिल को तुमने देखो काँन्ट्रॅक्ट दिलाया.. भारत की जनता को मूर्ख बनाया…
अब चाहे जीतने मारो तुम सिक्स और फोर… पुरी दुनिया बोले भाई चौकीदार है चोर…’
चौदा को तुमने बोहोत भाषण दिलवाये… पाच साल मे लेकिन तुमने किसे कटवाऐ…
वी डोन्ट हॅव मनी, मिस्टर मोदी एनी मोर… डोन्ट चीट अस मोदी वीआर नोट फूल्स एनीमोर…’
