स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपतींकडून आदरांजली
प्रखर राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक वीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आदरांजली वाहिली आहे.
जातीभेद आणि अस्पृश्यता यांसारख्या समाजातल्या अनिष्ट प्रथांविरोधात त्यांनी लढा पुकारला असं नायडू यांनी सांगितलं. आपली मातृभूमी स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी केलेला त्याग सदैव स्मरणात राहील असं त्यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे सावरकर त्याग आणि दृढता याचं प्रतीक होते असं त्यांनी म्हटलं आहे मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांनी केलेलं समर्पण देशातल्या लोकांच्या सदैव स्मरणात राहील असे मोदी यांनी म्हटलं आहे.

Source-AIR