वाशीतील फळ बाजार(APMC) उद्यापासून पुन्हा सुरू होणार
नवी मुंबई: नवी मुंबईत वाशी इथली कृषी उत्पादन बाजार समितीमधली फळांची बाजारपेठ उद्यापासून सुरू होणार आहे. आवारात फक्त २५० वाहनांना प्रवेश असेल तसंच किमान १५ हजार रुपयांची खरेदी करणाऱ्या घाउक ग्राहकांनाच प्रवेश राहील. किरकोळ ग्राहकांना प्रवेशबंदी राहील. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याच्या उद्देशानं हे निर्बंध घातले आहेत. दरम्यान बाजार समितीनं शेतकऱ्यांना थेट विक्रीसाठी नवी मुंबईत २ जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
Credit – AIR
