भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळांविरोधात पालकांना करता येईल तक्रार
मुंबई: शैक्षणिक शुल्कांचं नियमन करण्यासाठी राज्यात आठ विभागीय शुल्क नियामक समित्या आणि एक पुनर्निरीक्षण समितीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल केली.
भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळांविरोधात पालकांना या समित्यांकडे तक्रार करता येईल. प्रत्येक शैक्षणिक विभागासाठी एक याप्रमाणे या आठ विभागीय शुल्क नियामक समित्या लवकरच कामकाजाला सुरूवात करतील.
पुनर्निरीक्षण समिती ही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येईल, असं शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितलं.
Credit – AIR
