१८ वर्षांवरील सर्व भारतीयांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याच्या निर्णयाचं विविध राज्यांनी केलं स्वागत
देशात सध्या सुरू असलेली कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम येत्या २१ जूनपासून पूर्णपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाईल आणि याद्वारे १८ वर्षांच्या पुढच्या सर्व नागरिकांचं नि:शुल्क लसीकरण केलं जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली.
यासाठी राज्यांशी चर्चा करून मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातीलअसंही ते म्हणाले. दरम्यान कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी जाहीर केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत आता दिवाळी पर्यंत वाढवण्यात आली आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही स्वागत केलं आहे. लसीकरणाबाबतची नोंदणी, मंजुरी आणि प्रत्यक्ष लसीकरण याबाबतचे संपूर्ण नियंत्रण राज्यांकडं देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी काल जाहीर केलेल्या निर्णयाबद्दल हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
